Why Should You Read This Summary?
हे पुस्तकं मी का वाचायला हवं?
विचार करून पहा, तुम्ही एक असं जीवन जगत आहात ज्यात तुम्ही जे मनात येईल व जे तुम्हाला आवडेल ते करताहेत आणि त्यासाठी तुम्हाला पैसे देखील मिळताहेत. आता थोड इमॅजिन करा, तुम्ही असं काम करतं आहात, जे काम करण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता.
ते काम म्हणजे तुम्हीच मालक आणि तुम्हीच काम करणारे. याला दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर, तुम्ही असं काम करत आहात, जिथे तुम्हाला दुसऱ्यांसाठी काम करून त्यांना खूप जास्त प्रॉफिट कमवून देण्याची गरज नाही, कारण तुम्ही स्वतःसाठी आणि स्वतःला प्रॉफिट कमवून देण्यासाठी काम करताहेत.
मग, कस वाटलं ऐकून? Perfect ना? जर तुमचीही अशीच इच्छा असेल आणि तुम्ही असाच काहीतरी विचार करत असाल, तर हे पुस्तक तुमच्या साठीच लिहीले आहे.
(मित्रांनो) खरं तर या पुस्तकात तुम्हाला असा कोणताच शॉर्टकट भेटणार नाही, जो तुम्हाला तातडीने पैसे कमविण्याचा सोपा मार्ग सांगेल. कारण असा कोणता मार्गच नाही जिथे तुम्ही काम न करता तुम्हाला सक्सेस मिळेल.. पण जर तुम्हाला काही उत्कृष्ट टिप्स हव्या असतील तर हे पुस्तक नक्की वाचा.