Why Should You Read This Summary?
या पुस्तकाचे लेखक टोनी रॉबिन्स एकेकाळी फार निराश होते. ते एकटेच राहायचे, त्यांना नावडता जॉब करावा लागत होता. तसेच त्यांचे वजन देखील खूप जास्त वाढले होते. पण फक्त 3 वर्षाच्या कालावधीत त्यांनी स्वतःचा कायापालट केला.
हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी स्वतःला एक यशस्वी आणि आनंदी जीवन जगणारे व्यक्तिमत्व बनवले. नावाजलेल्या लेखकासोबतच ते सगळ्यांचे आवडते मोटिव्हेशनल स्पीकर देखील बनले.
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण टोनी यांच्याकडे कॉलेज ची कोणतीही डिग्री नाहीये. त्यांनी फक्त 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तरीही त्यांना भरभरून यश मिळाले. त्यांनी हे सगळं कसं साध्य केलं? याच सगळ्या गोष्टी टोनी आपल्याला या पुस्तकातून सांगतात.
जेणेकरून तुम्ही त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी ज्या गोष्टी केल्या आहेत त्यांचे अनुकरण करू शकता. या पुस्तकातून तुम्ही त्या अनमोल गोष्टींना शिकाल, ज्यांना टोनी आपल्या सेमिनार मध्ये सांगत असतात.
हे पुस्तक कोणी वाचावे?
जर तुम्हाला तुमच्या मनात असलेली भीती काढून टाकायची असेल आणि जर तुम्हाला तुमच्या जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचायला हवे.
लेखकाबद्दल:
टोनी रॉबिन्स [ अँथनी जे रॉबिन्स ] हे एक अमेरिकन लेखक, कोच, स्पीकर आणि फिलांथ्रोपिस्ट आहेत. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1960 मध्ये झाला. रॉबिन्स हे त्यांच्या इन्फोर्मेरियल्स, सेमिनार आणि सेल्फ हेल्प बुक्स ( अनलिमिटेड पॉवर आणि अवेकन द जायंट विदिन ) साठी लोकप्रीय आहेत. रॉबिन्स रिसर्च इंटरनॅशनल द्वारे त्यांचे सेमिनारस् आयोजित केले जातात.
आतापर्यंत टोनी यांनी बऱ्याच लोकांना मदत केली आहे, जसं की राजकारणी, बिझनेस एक्सिक्यूटिव्ह, खेळाडू आणि अशी सामान्य माणसे जे स्वतः कुठल्या तरी भीती ने ग्रासलेले होते. ते 25 वर्षांचे होईपर्यंत त्यांनी खूप यश मिळवले होते.