Why Should You Read This Summary?
कर्करोगासारख्या प्राणघातक आजाराशी झगडणाऱ्या व्यक्तीला शेवटच्या क्षणी काय वाटतं असेल? त्याच्या मनात कोणते विचार येत असतील? त्याला हे शेवटचे क्षण त्याचा जवळच्या लोकांसोबत कसे घालवायचे असतील? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे केवळ मृत्यूच्या दारात असलेल्या व्यक्तीद्वारेच दिली जाऊ शकतात.
"व्हेन ब्रीथ बिकम्स एयर" या पुस्तकात अशाच प्रकारच्या भावनिक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
पुस्तकाविषयी:
ही एक रियल स्टोरी आहे. या पुस्तकात इमोशंस आणि ट्रेजेडीची मिश्रित कथा तुम्हाला पाहायला मिळेल जी प्रत्येक वाचकाच्या हृदयाला स्पर्श करेल.
हे पुस्तक कोणी वाचायला हवे?
जर तुम्ही तुमच्या लाईफ मधल्या छोट्या मोठ्या संकटांना घाबरत असाल, तर हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचायला हवे. या पुस्तकाच्या लेखकांनी त्यांच्या जीवनाच्या सगळ्यात कठीण काळातील / मृत्यूच्या दारात असताना स्वतःच्या अनुभवांचे कथन केले आहे.
लेखकाबद्दल:
पॉल सुधीर अरुण कलानिथी यांचा जन्म 1 अप्रैल, 1977 मध्ये झाला होता. ते एक इंडो-अमेरिकन न्यूरोसर्जन आणि राइटर होते. ज्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत लंग कॅन्सर सोबत लढाई केली. ही खरंच दुर्दैवी घटना आहे की त्यांच्या सारख्या एका कमी वयाच्या टॅलेंटेड न्यूरोसर्जन ला या जगाला निरोप द्यावा लागला. पण त्यांच्या पुस्तकांमधून ते आजदेखील अजरामर आहेत.