Why Should You Read This Summary?
पुस्तकाविषयी:
तुम्ही देवाला पाहिलं आहे का? असेच प्रश्न स्वामी विवेकानंद, लहान असताना विचारत होते. त्यांनी जीवनातल्या प्रत्येक सुख-सुविधा देणाऱ्या गोष्टी सोडून दिल्या होत्या. फक्त एक काठी आणि कटोरी सोबत त्यांनी पूर्ण भारत देशाचा प्रवास केला. ते देवाला पाहू इच्छित होते आणि लवकरच ते त्यात यशस्वीही झाले.
या पुस्तकाच्या समरी मध्ये तुम्ही स्वामी विवेकानंदांच्या आयुष्याबद्दल ऐकणार आहात. ते जेव्हा लहान होते तेव्हा कसे होते? ते कसे एवढे महान व्यक्तीमत्व बनले? त्यांच्यामध्ये असं काय होतं की अमेरिकेत त्यांना सर्वजण एवढं पसंत करत होते? काय आहे त्यांची गोष्ट, त्यांचे ध्येय आणि का त्यांची आजही आठवण काढली जाते? तर या पुस्तकाच्या समरी मध्ये तुम्हाला त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.
हे पुस्तक कोणी वाचावे?
हे पुस्तक सगळ्यांनीच वाचायला हवे. कारण हे पुस्तक आपल्याला “सर्व धर्म एक समान” हे तत्व शिकवते. आणि हे देखील सांगते की, आपल्या सगळ्यांचा धर्म 'माणुसकी' हाच आहे.
या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
स्वामी निखिलानंद! त्यांचा जन्म 1895 ला बांगलादेशात दुर्गापुर या गावी झाला होता. जे त्या काळी ब्रिटिश इंडीया च्या साम्राज्यात येत होते. त्यांनी रामकृष्णा विवेकानंद सेन्टर ची सुरूवात
न्यू यॉर्क मध्ये केली. त्यांना मोठमोठ्या प्रसिद्ध लेखक आणि विचारवंतांच्या यादीत गणले जाते.