Why Should You Read This Summary?
आपण ही समरी का वाचली पाहिजे?
खुप कष्ट करूनही तुम्हाला हवे तसे यश मिळत नाही आहे का? तुम्हाला असाधारण (एक्स्ट्राऑर्डिनरी) यश मिळवायचे आहे का? जर तुमचे उत्तर होय असेल, तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. गो-गिव्हर मध्ये खुप छान कथा आहेत, ज्यामधून तुम्ही बरेच धडे शिकू शकता. तुम्ही शिकाल की, जेव्हा तुम्ही एखाद्याला मन भरुन काहितरी देता, तेव्हा तुम्हाला यश देखील अगदी घवघवीत मिळते. म्हणून गो-गेटर बनु नका. गो-गिवर व्हा आणि तुमचे आयुष्य कसे बदलून जाईल तुम्हाला कळणार पण नाही.
हे पुस्तक कोणी वाचावे?
सेल्स, इंश्योरेन्स किंवा रिअल इस्टेट एजंट्स, नियमित कर्मचारी, मैनेजर्स, बिज़नेस ओनर्स, अशा सर्व प्रोफेशनच्या लोकांनी हे पुस्तक वाचायलाच हवे.
लेखका बद्दल माहिती:
बॉब बर्ग एक बेस्ट सेल्लिंग पुस्तकाचे लेखक आणि लोकप्रिय कीनोट स्पीकर आहेत. 30 वर्षांहून अधिक काळ ते कंपनींना आणि सेल्स लीडर्सना घेण्यापेक्षा कसे जास्त द्यायचे आणि बदल्यात जास्त पैसे कसे कमवायचे हे शिकवतात. अजुन पण, बॉब आपल्या वर्कशॉप, पॉडकास्ट्स, ब्लॉग्स आणि स्पीकिंग इवेंट्सद्वारे अनेक लोकांच्या आयुष्यांना स्पर्श करुन, त्यांना प्रभावित करुन त्यांचे आयुष्य बदलत आहेत. जॉन डेव्हिड मॅन एक थॉट लीडर आणि लेखक आहेत. त्यांच्या पुस्तकांसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. जगभरात त्यांच्या पुस्तकांच्या 3 मिलियनहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत आणि त्या पुस्तकांचे सुमारे 35 भाषांमध्ये अनुवाद केले आहेत.