Why Should You Read This Summary?
पुस्तकाविषयी:
तुम्ही तुमच्याबद्दल ज्या काही नकारात्मक गोष्टींचा विचार करता त्या पूर्णपणे खोट्या आहेत. तुम्ही देखील यशस्वी, श्रीमंत, आनंदी होऊ शकता. या पुस्तकात, जेन सिंचेरो आपल्याला सेल्फ लव बदल सांगतात आणि आपण स्वतःवर विश्वास कसा ठेवावा हे देखील शिकवतात. तसेच आपण वास्तवात का आणि कसे जगू शकतो हे देखील तुम्ही शिकू शकता.
हे पुस्तक कोणाला वाचायला हवे?
•जे पलंगावर बसून टीव्ही पाहण्यात वेळ घालवतात.
•जे लोक स्वत:ला कुरुप समजतात.
दुःखी, गरीब, बेरोजगार किंवा नोकरीत खुश नसलेल्या लोकांनी हे पुस्तकं नक्कीच वाचायला हवे.
•ज्यांना स्वतः च्या किंवा इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे.
लेखकाविषयी:
जेन सिंचेरो एक यशस्वी प्रशिक्षक, मोटिवेशनल स्पीकर आणि प्रसिद्ध लेखिका आहे. त्या आपल्या पुस्तकांद्वारे, बातमीपत्रांतून, कार्यक्रमांतून आणि चर्चासत्राद्वारे लोकांना आपले जीवन बदलण्यासाठी मोटिवेट करतात. जेन कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसमध्ये राहतात पण त्या त्यांचे विचार सगळ्या जगापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.